इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्… भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर

इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्… भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर

| Updated on: Jul 07, 2026 | 4:56 PM

केरळमधील वायनाड जिल्ह्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचं संकट कोसळलं आहे. मेप्पाडी जवळील कल्लाडी परिसरात भीषण भूस्खलन झाल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. या दुर्घटनेचे CCTV व्हिडीओही समोर आले आहेत. हे फुटेज समोर येताच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्लाडी टनल प्रकल्पाच्या कामादरम्यान खोदकामातून साचलेला मलबा अचानक घसरून खाली आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भुस्स्खलन झाले. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी 7 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत वायनाडमध्ये तब्बल 265 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Published on: Jul 07, 2026 4:51 PM
Follow Us