Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?

Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?

| Updated on: Oct 27, 2026 | 8:15 PM

प्रदीप पूर्णकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक काळ एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या पतीची यापूर्वी सात वेळा चौकशी झाली होती. पूर्णकर यांच्या मुलाने एका व्हिडिओद्वारे शिंदे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर हे प्रकरण आणखी तापले आहे.

ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणात आता मीनाक्षी शिंदेंची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात त्यांची गेल्या तीन तासांहून अधिक काळ चौकशी सुरू आहे. दुपारी १२.४५ वाजता त्या पथकासमोर हजर झाल्या होत्या. डीसीपी अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाच्या संदर्भात मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची यापूर्वी सात वेळा एसआयटीने चौकशी केली होती. प्रदीप पूर्णकर यांचे पुत्र राम पूर्णकर यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी करून राजेंद्र शिंदे आणि या प्रकरणातील आरोपी एकत्र असल्याचा दावा केला होता.

तसेच, पाचवा आरोपी अमित सिंग हा डमी असून राजेंद्र शिंदेच प्रत्यक्ष आरोपी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राम पूर्णकर यांनी राजेंद्र शिंदेंना २४ तासांत अटक करण्याची मागणी केली होती आणि तसे न झाल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घडामोडींमुळे ठाण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता मीनाक्षी शिंदे यांच्या जबाबाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Oct 27, 2026 8:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us