शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदावरून रस्सीखेच सुरु

| Updated on: Jul 01, 2022 | 4:33 PM

शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदावरून रस्सीखेच सुरु झाल्याची महिती समोर आली आहे. मंत्रीपदावरून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे . अब्दुल सत्तार व सुभाष भांबरे यांच्यामुळे आपले मंत्रीपद जाईल का अशी भीती शिरसाट यांच्या मनात निर्माण झाली आहे.

Follow us on

मुंबई – शिवसेनेचे(Shivsena)  बंडखोर आमदारांनी एकत्र येत भाजप(BJP) बरोबर सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नुकतंच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा मुख्यमंत्री म्हणूंन व देवेंद्र फडणवीस याचा उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथविधी सोहळा संपन्न झाला.नवीन सरकारला बहुमत सिद्ध करण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र दुसरीकडं शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदावरून रस्सीखेच सुरु झाल्याची महिती समोर आली आहे. मंत्रीपदावरून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे . अब्दुल सत्तार व सुभाष भांबरे यांच्यामुळे आपले मंत्रीपद जाईल का अशी भीती शिरसाट यांच्या मनात निर्माण झालीआहे.