Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर

Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर

| Updated on: Nov 26, 2026 | 12:52 PM

मुंबईतील फोर्ट परिसरात एका दुकानाच्या पाटीवर बॉम्बे हा शब्द लिहिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ दुकानावर मुंबई लिहिण्याचे पोस्टर लावून दुकान मालकाला याबाबत सक्ती केली. बॉम्बे हा शब्द जाणूनबुजून वापरल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मुंबईतील फोर्ट परिसरात एका दुकानाच्या पाटीवर बॉम्बे या शब्दाचा वापर केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. बॉम्बे या शब्दाला मनसेने तीव्र विरोध दर्शवला असून, दुकानावर तातडीने मुंबई असे लिहिण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे फोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मनसे कार्यकर्त्यांनी थेट दुकानाच्या पाटीवरील बॉम्बे या शब्दावर मुंबई लिहिलेले एक पोस्टर लावले. दुकान मालकाने जाणूनबुजून बॉम्बे हा शब्द वापरला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्वातंत्र्यानंतर आणि शहराचे नामकरण मुंबई झाल्यानंतरही काही व्यावसायिक जुना उल्लेख वापरत असल्याबद्दल मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेने दुकान मालकाला बॉम्बे ऐवजी मुंबई असा शब्द वापरण्याची सक्ती केली आहे. भविष्यात अशाप्रकारे बॉम्बे हा शब्द वापरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. यामुळे शहरातील नामकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Nov 26, 2026 12:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us