तळवे चाटण्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका अन् त्यात मनसेची उडी, बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

तळवे चाटण्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका अन् त्यात मनसेची उडी, बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 19, 2023 | 10:54 PM

VIDEO | अमित शहा आणि संजय राऊत यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मनसेची प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेबाबत टीव्ही ९ मराठीचा बघा स्पेशल रिपोर्ट...

मुंबई : तळवे चाटण्यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. दरम्यान या वादामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, अमित शाह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मात्र त्यांनी केलेलं विधान आणि त्या विधानामुळे संजय राऊत पुन्हा एकदा वादात सापडले आहे. केवळ मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले असा आरोप अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी असे म्हटले की, महाराष्ट्रात अशी चाटुगिरी कधीच झाली नाही. तर या दोघांच्या वादात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडी घेत मी तिथे असतो तर संजय राऊत यांच्या कानाखाली मारली असती असे वक्तव्य केले. याच आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेबाबत टीव्ही ९ मराठीचा बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 19, 2023 10:54 PM