Nanded Bus Stand : नांदेड बस स्थानकात मुजोर उत्तर भारतीय व्यक्तीला मनसेकडून चोप, महिलांकडून मागायचा…
नांदेडच्या एसटी महामंडळाच्या बस स्थानकात एका उत्तर भारतीय व्यक्तीचा मुजोरपणा पाहायला मिळाला. मराठीतही तो बोलण्यास नकार देत असल्याचे पाहायला मिळालं होतं. याच व्यक्तीला मनसैनिकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसैनिकांच्या खळखट्ट्याक स्टाईलची चांगलीच चर्चा होतेय. मग ते मुंबईतील अमराठी व्यापाऱ्याला मारहाण प्रकरण असो किंवा परप्रांतीय लोकांकडून मराठीचा होणारा अपमान असो, मनसैनिक मराठीचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्याला चोप दिल्याशिवाय राहत नाही. अशातच नांदेडच्या एसटी बस स्थानकात मुजोर उत्तर भारतीय व्यक्तीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. नांदेडच्या एसटी बस स्थानकात मुजोर उत्तर भारतीय व्यक्ती बस स्थानकात असणाऱ्या शौचालयाच्या वापरासाठी महिलांकडून पाच रूपये घेतल असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर याच व्यक्तीला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला. बघा व्हिडीओ
Published on: Jul 23, 2025 07:39 PM
