मला न विचारता पोस्टर लावला, आता…; भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागल्यानंतर सुप्रिया सुळे यांची आक्रमक प्रतिक्रिया

मला न विचारता पोस्टर लावला, आता…; भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागल्यानंतर सुप्रिया सुळे यांची आक्रमक प्रतिक्रिया

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 23, 2023 | 1:40 PM

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाने मुंबईत पोस्टर लागले आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्या काय म्हणाल्यात? त्यांची प्रतिक्रिया पाहा, सविस्तर...

बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाने मुंबईत पोस्टर लागले आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “असे पोस्टर कुठे लागले मला माहित नाही. मी पाहिलं नाही. फोटो कोणी लावलाय? एकतर पोस्टर कोणी लावला? हे पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टर लावले पाहिजेत, याला याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा कुणालाही अधिकार नाही. जर कोणी लावला असेल. त्या पोस्टरवर कोणाचं नाव नसेल तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल त्यावर कारवाई व्हावी. मी मुंबई पोलिसांना विनंती करते की, त्यांनी न्याय मिळवून द्यावा., असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Published on: Feb 23, 2023 1:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us