मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

| Updated on: Nov 24, 2026 | 2:21 PM

मुंबईतील सर्वात मोठ्या पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने आयोजित हा महोत्सव सहा दिवस चालणार असून, त्यात चारशेहून अधिक प्रकाशकांची लाखो पुस्तके उपलब्ध असतील. वाचन संस्कृती वाढवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

मुंबईतील सर्वात मोठ्या मुंबई पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारने एकत्रित येऊन या महोत्सवाचे आयोजन मुंबई विद्यापीठात केले आहे. पुस्तक प्रेमी आणि साहित्य प्रेमींसाठी पुढील सहा दिवस हा महोत्सव खुला राहणार आहे. या महोत्सवात वेगवेगळ्या भाषांमधील चारशेहून अधिक प्रकाशकांची लाखो पुस्तके साडेसहाशे बुक स्टॉलवर मांडण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी आणि ती जोपासली जावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नडा, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषांची पुस्तके उपलब्ध आहेत. डिजिटल युगातही वाचनाचे महत्त्व कायम राहावे, यासाठी हा एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शिक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारने केले आहे.

Published on: Nov 24, 2026 2:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us