Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?

Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?

| Updated on: Aug 19, 2026 | 1:08 PM

मुंबई महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25 लाख 12 हजार 786 रुपये खर्च करणार आहे. महापौरांचे सोशल मीडिया सांभाळण्यासाठी स्थायी समितीत प्रस्ताव ठेवला जाणार आहे. महापालिकेकडे स्वतःचा जनसंपर्क विभाग असताना आणि सध्याचे अपडेट्स पाहता, इतक्या मोठ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख 12 हजार 786 रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आज ठेवण्यात येणार आहे. एका वर्षाच्या कामासाठी निविदा मागवण्याचा महापालिकेचा मानस आहे. या प्रस्तावामुळे महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर रितू तावडे यांचे सोशल मीडिया सध्या कार्यरत असल्याचे दिसून येते.

मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचा जनसंपर्क विभाग असून त्यात पगारदार अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. असे असताना सोशल मीडिया सांभाळण्यासाठी 25 लाखांचा अतिरिक्त खर्च का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कंटेंट रायटर, व्हिडीओ एडिटर आणि ग्राफिक्स डिझायनर अशा तीन व्यक्तींची टीम दरमहा 1 लाख रुपये खर्चात म्हणजेच वर्षभरात सुमारे 12 लाख रुपयांमध्ये हे काम करू शकते. त्यामुळे 25 लाखांचा हा खर्च अनावश्यक आणि भरमसाठ असल्याचे बोलले जात आहे. अखेर या प्रकरणावर रितू तावडे यांनी थेट स्पष्टीकरण दिलं आहे. इतकेच नाही तर प्रस्तावात नेमकं काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

Published on: Aug 19, 2026 1:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us