Mumbai-Pune Connectivity Disrupted | पुण्याचं मुंबईशी कनेक्शन तुटलं! दुसऱ्या बोगद्यावरही… सर्वात मोठी अपडेट समोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली असून पुण्याचं मुंबईशी कनेक्शन काही काळासाठी तुटल्याचं चित्र पाहायला मिळालं. मिसिंग लिंक प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या आधी अचानक दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली असून पुण्याचं मुंबईशी कनेक्शन काही काळासाठी तुटल्याचं चित्र पाहायला मिळालं. मिसिंग लिंक प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या आधी अचानक दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने सर्व वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली आहेत.
दरड कोसळल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलिस, महामार्ग प्रशासन आणि बचाव पथक दाखल झाले. रस्त्यावर पडलेले दगड आणि माती हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. या घटनेमुळे रोज मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, दरड कोसळतानाचा व्हिडीओही समोर आला असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होत आहे. पावसामुळे एक्स्प्रेसवेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
