Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान

Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान

| Updated on: Jul 04, 2026 | 12:03 PM

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोड पुन्हा एकदा जलमय झाला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीरा देसाई रोडलगतच्या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून, दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक वाहने अडकली असून, काही गाड्या बंद पडल्याचीही माहिती समोर आली आहे. वाहनचालकांना बंद पडलेल्या गाड्या पाण्यातून ढकलत सुरक्षित ठिकाणी हलवाव्या लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

परिस्थिती आणखी गंभीर होत असून, रस्त्यावरील पाणी आता परिसरातील दुकानांमध्येही शिरू लागले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे, तर रस्त्यांवर पाणी साचल्याने डिव्हायडरही पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Published on: Jul 04, 2026 12:03 PM
Follow Us