Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
मुंबई आणि उपनगरांमध्ये अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.
दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, मलबार हिल तसेच इतर काही भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. जून महिन्याचा अर्धा काळ उलटल्यानंतरही पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना आराम मिळाला आहे. शिवाजी पार्क परिसरात अनेक नागरिक पावसाचा आनंद घेताना दिसून आले. काही ठिकाणी नागरिकांनी सकाळच्या पावसात फेरफटका मारत हवामानातील बदलाचा आनंद लुटला.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाच्या या सुरुवातीमुळे शहरातील तापमानातही घट झाली असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या मुंबईभर पाहायला मिळत आहे.
