Karuna Sharma : करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, मुंबई सत्र न्यायालयानं काय म्हटलं?

Karuna Sharma : करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, मुंबई सत्र न्यायालयानं काय म्हटलं?

Harshada Shinkar | Updated on: Apr 09, 2025 | 7:27 PM

करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध हे लग्नासारखेच असं मुंबई सत्र न्यायालयाने म्हटलंय. करुणा आणि धनंजय मुंडे दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही अशी ही टिप्पणी कोर्टाकडून करण्यात आलेली आहे.

करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच मुंबई सत्र न्यायालयाने ही मोठी टिप्पणी केली आहे. दोघांनी दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. माझगाव सत्र न्यायालयाचं हे निरीक्षण आहे. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. करुणा शर्मा यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या बांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा होता. तर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकर्‍यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यांसारखी जीवनशैली मिळायला हवी असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटल आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत नुकतीच उपलब्ध झालेली आहे.

Published on: Apr 09, 2025 7:27 PM
Follow Us