Nagesh Ashtikar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर कधी बोललो नाही, बोलणारही नाही; आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना (ठाकरे गट) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षांतरानंतर सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.
शिवसेना (ठाकरे गट) सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षांतरानंतर सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना ‘गद्दार’ तसेच ‘खोके’ अशा शब्दांत हिणवले जात असल्याबाबत विचारले असता आष्टीकर म्हणाले, “अशा प्रकारच्या चर्चांना दोन-चार दिवस उधाण येतं. मात्र मी घेतलेला निर्णय हा सर्वांच्या हिताचा विचार करूनच घेतला आहे.”
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदराची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. “मी आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काहीही बोललो नाही आणि यापुढेही बोलणार नाही,” असे आष्टीकर यांनी सांगितले.
तसेच पक्षांतराच्या निर्णयामागे कोणतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी कोणावरही नाराज नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर तर अजिबात नाराज नाही. नाराजीतून किंवा वैयक्तिक कारणांमुळे मी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आष्टीकर यांच्या पक्षप्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
