नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई

नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई

| Updated on: Sep 04, 2026 | 3:17 PM

नागपूरमध्ये डीजेवरील बंदीनंतर आता पहिल्या कारवाईसाठी पोलीस सज्ज झाले आहेत. पोलीस उपायुक्त राहुल मदने बडकस चौकात पोहोचले आहेत, जिथे डीजेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सकाळीच या ठिकाणी डीजेचे साहित्य पोहोचले होते. नागपुरात आज सकाळीच पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईचे संकेत दिले होते. आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्या माहितीनुसार, नागपुरातील बडकस चौकात आयोजक डीजे वाजवण्यावर […]

नागपूरमध्ये डीजेवरील बंदीनंतर आता पहिल्या कारवाईसाठी पोलीस सज्ज झाले आहेत. पोलीस उपायुक्त राहुल मदने बडकस चौकात पोहोचले आहेत, जिथे डीजेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सकाळीच या ठिकाणी डीजेचे साहित्य पोहोचले होते. नागपुरात आज सकाळीच पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईचे संकेत दिले होते. आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्या माहितीनुसार, नागपुरातील बडकस चौकात आयोजक डीजे वाजवण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. यामुळे नागपूर पोलिसांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. डीजेच्या आवाजाचे डेसिबल मोजण्यासाठी पोलिसांनी विशेष मशीन्स आणली आहेत.

न्यायालयाच्या निर्देशानुसार ७५ डेसिबलपर्यंतचा आवाज नियमानुसार आहे. त्यापेक्षा जास्त आवाज आढळल्यास कारवाई करण्याची शक्यता आहे. हे डेसिबलचे यंत्र पोलीस वापरत आहेत. याचा वापर करून स्पीकरचा आवाज आणि डेसिबलची पाहणी केली जात आहे. पोलीस या मशीन्सद्वारे डीजेचा आवाज ७५ डेसिबल मर्यादेत आहे की नाही, याची खात्री करत आहेत.

Published on: Sep 04, 2026 3:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us