Nanded : बाप की हैवाण! पोटच्या मुलीसह प्रियकराचे हात-पाय बांधले अन् विहिरीत… नांदेडमध्ये खळबळ, नेमकं घडलं काय?

Nanded : बाप की हैवाण! पोटच्या मुलीसह प्रियकराचे हात-पाय बांधले अन् विहिरीत… नांदेडमध्ये खळबळ, नेमकं घडलं काय?

| Updated on: Aug 26, 2025 | 9:52 AM

वडिलाने विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं. लखन भंडारे आणि संजीवनी कमळे असं मूर्त प्रेम युगुलाची नावे आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील घटना घटली. नराधम बापाने टोकाचे पाऊल उचलत दोघांचे आयुष्य संपवलं.

नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पित्यानेच आपल्या विवाहित मुलीचे आणि तिच्या प्रियकराचे हातपाय बांधून थेट विहिरीत फेकलं. ही घटना नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित प्रेयसीला सासरी जाऊन भेटणाऱ्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर तुमची मुलगी तुमच्या घरी घेऊन जा, अशी तक्रार सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडिलांकडे केली.

या प्रकारानंतर मुलीला गावाकडे घरी परत नेत असताना मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी विवाहित लेकीसह तिच्या प्रियकराला संपवलं. या खळबळजनक प्रकारानंतर तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. रात्री बारा वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. जुन्या प्रेम संबंधातून घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लखन भंडारे आणि संजीवनी कमळे असं मृत प्रेम युगुलाची नावे आहेत. तर टोकाचे पाऊल उचलणाऱ्या नराधम आरोपी वडिलाचे मारोती सुरने असे असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

Published on: Aug 26, 2025 09:52 AM