नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक बोलावली बैठक

नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक बोलावली बैठक

| Updated on: Jun 09, 2026 | 3:04 PM

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात बंडखोरी करणारे गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांपासून मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. काल मंत्री दादा भूसे यांनीही चर्चांमध्ये सहभाग घेतला. तिन्ही वरिष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळाले असून प्रसाद हिरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र वाद अजून सुरुच आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक बैठक बोलवली आहे. संध्याकाळी सात वाजता ही बैठक घेतली जाणार असून सर्व मंत्र्यांना त्यांनी बोलवलं आहे. नाशकातील बंडखोरीमुळी शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचंही सांगितलं जात आहे. ही बैठक नंदनवन बंगलल्वर बोलवली गेली आहे. आता या बैठकीत नेमकं काय घडेलं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jun 09, 2026 3:04 PM
Follow Us