Nashik Unlock | नाशिकमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता, दुकाने-हॉटेल्सची वेळ वाढवली

Nashik Unlock | नाशिकमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता, दुकाने-हॉटेल्सची वेळ वाढवली

| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 03, 2021 | 10:05 AM

नाशिकला दिलासा मिळाला असून आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेत. नाशिकमध्ये आता हॉटेलमध्ये 50 टक्के ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुपारनंतर पार्सल सुविधा देखील सुरू ठेवता येईल. नाशिकमधील निर्बंध शिथिल झाल्यानं गेल्या दीड वर्षांपासून अडचणीत आलेल्या मिसळ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सरकारने कोरोनाचे नवे निर्बंध जारी केलेत. यानुसार काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आलेत, तर काही ठिकाणी निर्बंध वाढलेत. यात नाशिकला दिलासा मिळाला असून आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेत. नाशिकमध्ये आता हॉटेलमध्ये 50 टक्के ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुपारनंतर पार्सल सुविधा देखील सुरू ठेवता येईल. नाशिकमधील निर्बंध शिथिल झाल्यानं गेल्या दीड वर्षांपासून अडचणीत आलेल्या मिसळ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिसळची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या मिसळ व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. आता यामुळे व्यावसायाची गाडी रुळावर यायला मदत होईल अशी भावना ते व्यक्त करत आहेत.

Follow Us