Sanjay Shirasat | ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना… संजय शिरसाट असं का म्हणाले?

| Updated on: Apr 09, 2026 | 6:27 PM

माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या...

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातदेखील महिलांचे मानसिक, शारीरिक शोषण केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपनीतील महिलांचे ऑफिसामधील कर्मचार्‍यांनीच लैंगिक शोषण, छेडछाड तसेच फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी सविस्तर मत मांडले. माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर संजय शिरसाटांनी जोरदार उत्तर दिलं. जेव्हा पत्रकरांनी विचारलं की, आदित्य ठाकरे देखील कार्यकर्त्यांना भेटतील ते देखील भाकरी पलटवण्याच्या तयारीत आहेत यावर तुम्हाला काय वटतं? तेव्हा संजय शिरसाट म्हणाले, ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना नक्की पलटवतील.’

Published on: Apr 09, 2026 6:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us