नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल

नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल

| Updated on: Nov 08, 2026 | 12:57 PM

नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट. माजी खासदार इम्तियाज जलील, नगरसेवक मतीन पटेल यांच्यासह 11 जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले असून, एसआयटीने जलील यांना यापूर्वी नोटीस बजावली होती.

नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाच्या तपासात मोठे अपडेट समोर आले आहे. या गुन्ह्याशी संबंधित नवीन संशयितांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये माजी खासदार इम्तियाज जलील आणि नगरसेवक मतीन पटेल यांच्यासह एकूण 11 जणांचा समावेश आहे.

नाशिक जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये या पाच ते 11 आरोपींविरोधात हे पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यापूर्वी, विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी खासदार इम्तियाज जलील यांना दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि जबाब नोंदवला होता. आता पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.

Published on: Nov 08, 2026 12:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us