Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने….
नाशिक शहरातील जेलरोड परिसरात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहानंतर आशा घोटेकर यांचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.
नाशिक शहरातील जेलरोड परिसरात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहानंतर आशा घोटेकर यांचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. तसेच सासरकडून 25 लाख रुपये आणि 21 तोळे सोन्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे. या प्रकरणात जादूटोणा करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही पोलिसांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, मृत महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे विवाहितेवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला होता. अखेर सततच्या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
