नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघात, ‘माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी…’

नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघात, ‘माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी…’

Harshada Shinkar | Updated on: Nov 07, 2024 | 5:28 PM

माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी सोडत नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली होती. त्यावर यशोमती ठाकूर यांनी पलटवार केलाय. बघा नेमकं काय म्हणाल्या?

नवनीत राणा यांना टाळूवरचं लोणी खाण्याची सवय आहे, असं वक्तव्य करत यशोमती ठाकूर यांनी हल्लाबोल केलाय. ‘तिवसा मतदारसंघात गेल्या तीन टर्मपासून यशोमती ठाकूर आमच्या नणंदबाई प्रतिनिधीत्व करत आहे. तर समोर बसलेले मतदार तुम्ही सगळे इमानदार आहेत. पण माझ्या नणंदबाईला पैसा खूप आवडतो. या मतदारसंघात यशोमती ठाकूर यांनी गेल्या कितीतरी वर्षांपासून अशी परंपरा सुरू केली आहे की, माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचं लोणी सुद्धा सोडत नाही’, असे म्हणत नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केलाय तर नवनीत राणांच्या टीकेवर पलटवार करताना यशोमती ठाकूर असे म्हणाल्या, ‘नवनीत राणा ह्या फ्रस्टेट आहे. ते त्यांच्या यजमानांना काम करताना बघतात. बहुतेक ते लोणी त्यांच्या यजमानांच आहे की काय? कारण नांदगावपेठमध्ये मेडिकल कॉलेज येणार होतं. ते त्यांनी त्यांच्या जमिनी जिथे आहे तिथे शिफ्ट केलं. म्हणजे आता मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी कोण खातंय?’, असे वक्तव्य करत नवनीत राणांनाच त्यांनी उलटसवाल केलाय. बघा नेमकं काय म्हणाल्या?

Published on: Nov 07, 2024 5:28 PM
Follow Us