Nawab Malik | पब, पार्टीत कोण असतं हे उद्यापासून आम्हाला काढायला लावू नका: नवाब मलिक

Nawab Malik | पब, पार्टीत कोण असतं हे उद्यापासून आम्हाला काढायला लावू नका: नवाब मलिक

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 28, 2021 | 1:43 PM

आशिष शेलार यांना एवढंच सांगायचंय की आम्ही कुणाला घाबरत नाही, पब पेग आणि पार्टीत सरकार मग्न म्हणता मग या पार्टीत कोण असतं पबला कोण असतं हे ऊद्यापासून आम्हाला काढायला लावू नका, आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 

दोन वर्षांच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत सरकार इथपर्यंत पोहोचलं आहे. कोविड काळात राज्य सरकारने केंद्रापेक्षाही चांगलं काम केलं.  तिथे शव नदीत वाहत होते, पण इथे आम्ही रुग्णांना वाऱ्यावर सोडलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कुणालाही सरकार स्थापन करता येत नाही हे भाजपला आत्तापर्यंत  कळायला हवं होतं. आम्ही ठाम आहोत सरकार चालेल, आणि काहीही झालं तरी पडणार नाही. दोन वर्ष सरकार पडेल असं बोलून भाजप थकलं आत्ता बोलायला काही राहीलं नाहीये. आशिष शेलार यांना एवढंच सांगायचंय की आम्ही कुणाला घाबरत नाही, पब पेग आणि पार्टीत सरकार मग्न म्हणता मग या पार्टीत कोण असतं पबला कोण असतं हे ऊद्यापासून आम्हाला काढायला लावू नका, आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

 

Follow Us