राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!

| Updated on: Jun 08, 2026 | 4:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सर्वात महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी किशोर मिसाळांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सांगितलं.

किशोर मिसाळ यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. हे वक्तव्य अत्यंत घृणास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले.

छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना तटकरे म्हणाले की, भुजबळ हे पक्षाचे संस्थापक नेते आहेत आणि ते त्यांच्या शैलीत भावना व्यक्त करत असतात. तसेच पक्षात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात NDA ची महत्त्वाची बैठक होणार असल्याने पक्षाचा 27 वा वर्धापन दिन आता 11 जून रोजी शण्मुखानंद हॉलमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Published on: Jun 08, 2026 4:44 PM
Follow Us