अनिल देशमुख २१ महिन्यांनंतर आज स्वगृही परतणार, कार्यकर्त्यांसह कुंटुंबीयांकडून जंगी तयारी
अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाल्यावर प्रथमच नागपुरात येणार, बघा कशी आहे स्वागताची तयारी?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तब्बल दोन वर्षानंतर आज नागपूरात येत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उत्साही आहे. अनिल देशमुख यांचा नागपूरातील बंगल्याची सजावट सुरू असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरी सुद्धा दिवाळीप्रमाणे लाइटिंग लावून अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी घर सजविण्यात आलेले पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन मधील बंगल्यावर लायटिंग लावली केली असून, पेंटिंगचं कामही झाले आहे. शिवाय त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची वर्दळंही वाढली आहे. आज राष्ट्रवादीची नागपूरात बाईक रॅली आहे. अनिल देशमुख आज नागपूरात येत आहेत, हाच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
Published on: Feb 11, 2023 9:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
