आमदारकीबद्दल राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानंच केली टीका, नेमकं काय म्हणाले बघा

| Updated on: Feb 06, 2023 | 11:33 AM

नोंदणी करूनही आमदार होत नाही दुसरेच कोणीतरी आमदार होतात, नाव न घेता अमोल मिटकरी यांनी कुणाला लगावला टोला?

Follow us on

अकोला : महाराष्ट्र विधिमंडळात असे अनेक आमदार जे कोट्यवधी रूपये खर्च करून आमदार झालेत. तर अनेक असेही आहेत की नोंदणी करूनही आमदार होत नाही दुसरेच कोणीतरी आमदार होतात, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. सध्याच अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजय झाले असून या निवडणूकीत भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे, त्यावर बोलताना मिटकरी यांनी हा टोला लगावला आहे.

महाराष्ट्र विधिमंडळात असे आमदार आहेत की जे कोट्यावधी रुपये खर्च करून आमदार होतात आणि अनेक आमदार असे आहेत की जे नोंदणी केल्यानंतरही आमदार होत नाही तर दुसराच कोणीतरी आमदार होतो, असे म्हणत नाव न घेता डॉ. रणजित पाटील यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या भाषणादरम्यान बोलतांना मिटकरींनी ही टीका केली आहे.