NCP | राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा; अजित पवार अपघाताची CBI चौकशीची मागणी उभी
बुधवारी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 20 ते 25 आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अनुपस्थित होते, तरीही उपस्थित आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट चर्चा केली. या चर्चेत अजित पवार यांच्या अपघातानंतर देवगिरी बंगल्यावर घडलेल्या घटनांवर चर्चा झाली.
बुधवारी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 20 ते 25 आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अनुपस्थित होते, तरीही उपस्थित आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट चर्चा केली. या चर्चेत अजित पवार यांच्या अपघातानंतर देवगिरी बंगल्यावर घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. तसेच, DGCA च्या अहवालावर शंका उपस्थित केल्या गेल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विमान अपघाताची CBI कडून चौकशी होण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. या मागणीबाबत काय परिस्थिती आहे, हे तपासण्यासाठी आमदारांनी सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे सुचवले. सुनेत्रा पवार यांनी उपस्थित आमदारांना आश्वस्त करत सांगितले की, “आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ असं सुनेत्रा पवार आमदारांना म्हणाल्या.
