मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा

| Updated on: Jul 16, 2026 | 12:28 PM

NEET पेपरफुटी प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. या पेपरफुटीत अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने पायदळी तुडवली गेली. या पेपरफुटीनंतर अनेक ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आला. अलीकडेच या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला होता. आता याचा सखोल तपास सुरू आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने कोर्टात मोठा युक्तीवाद केला आहे. त्यांनी सांगितले की रेणूका कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याने NTA पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला आणि पेपर पाच लाखात मिळवला होता. या सर्वा चर्चा आधीपासूनच सुरू होत्या, आता याला सीबीआयच्या तपासात दुजोरा मिळाला आहे. सीबीआयने कोर्टात केलेल्या अनेक दाव्यांनी आता पुन्हा खळबळ उडवली आहे. CBI च्या दाव्यानुसार मोटेगावरच्या फोनमध्ये केमिस्ट्रीचे एकूण १३२ प्रश्न सापडले आहेत. याशिवय अनेक बाबींच्या तापसासाठी फोनमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्यची शक्यता आहे.

नीट पेपरफुटीत अनेक प्राध्यापक आणि NTA मधील पेपरसेटर पोलिसांच्या रडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर लातूरमधील अनेक कोचिंग क्लासेसमधील तपासाला वेग आला आहे.

Published on: Jul 16, 2026 12:03 PM
Follow Us