PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी…
केंद्र सरकारने देशभरातील वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत नवीन नियम जाहीर केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या वयावर आधारित ही नवीन वैधता निश्चित केली आहे. यामुळे वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या श्रेणीनुसार PUC प्रमाणपत्राची वैधता तपासणे सोपे होईल.

नवीन नियमांनुसार, BS-4 श्रेणीतील खासगी वाहनांसाठी वयानुसार वेगवेगळ्या कालावधीची वैधता लागू होईल. ज्या वाहनांना 6 वर्षांपर्यंत पूर्ण झाले आहे, त्यांच्या PUC प्रमाणपत्राची वैधता 3 वर्षांसाठी असेल. 6 ते 10 वर्षांच्या वाहनांसाठी ही वैधता 1 वर्षाची निश्चित करण्यात आली आहे, तर 10 वर्षांवरील वाहनांसाठी 6 महिन्यांची वैधता अनिवार्य असेल.
व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत, BS-4 श्रेणीतील व्यावसायिक वाहनांना 2 वर्षांपर्यंतची PUC वैधता मिळणार आहे. याशिवाय, BS-1, BS-2 आणि BS-3 या श्रेणीतील वाहनांसाठी देशभरात PUC प्रमाणपत्राची वैधता 3 महिन्यांची असेल. या नियमांमुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.