Local Mega Block : मुंबईकरांनो… उद्या लोकलने प्रवास करताय? रेल्वेच्या ‘या’ मार्गावर असणार जम्बो ब्लॉक

Local Mega Block : मुंबईकरांनो… उद्या लोकलने प्रवास करताय? रेल्वेच्या ‘या’ मार्गावर असणार जम्बो ब्लॉक

Harshada Shinkar | Updated on: Dec 23, 2023 | 4:24 PM

उद्या पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल तर नक्की जाणून घ्या कसा असणार ब्लॉक... रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वे बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा जम्बो ब्लॉक घेणार आहे.

मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : पश्चिम रेल्वेवर रविवार 24 डिसेंबरच्या मध्यरात्री 00.35 ते 04.35 या वेळेत बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रात्रीचा जम्बो ब्लॉक असणार आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वे बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा जम्बो ब्लॉक घेणार आहे. ब्लॉक कालावधीत, अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावर चालतील आणि विरारकडे जाणाऱ्या सर्व धीम्या गाड्या गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालतील. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रविवार २४ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसभर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नाही आहे .

Published on: Dec 23, 2023 4:24 PM
Follow Us