Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!

Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!

| Updated on: Jul 12, 2026 | 4:16 PM

फॉर्च्यून इंडियाने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या 'मोस्ट पॉवरफुल वुमन 2026' कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उद्योग, वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य, सार्वजनिक धोरण आणि उद्योजकता क्षेत्रातील महिला नेत्यांची उपस्थिती होती.

फॉर्च्यून इंडियाने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या ‘मोस्ट पॉवरफुल वुमन 2026’ कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उद्योग, वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य, सार्वजनिक धोरण आणि उद्योजकता क्षेत्रातील महिला नेत्यांची उपस्थिती होती.

मुंबईतील फोर सीजन्स हॉटेलमध्ये हा विशेष कार्यक्रम पार पडला. या वेळी फॉर्च्यून इंडियाने ‘मोस्ट पॉवरफुल वुमन 2026’ यादी जाहीर केली. देशाच्या आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या 100 महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला.

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना यंदाच्या वर्षातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून प्रथम क्रमांक देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले गेले आहेत.

या प्रसंगी नीता अंबानी यांनी नेतृत्वात करुणा, समावेशकता आणि संधी यांना महत्त्व असल्याचे सांगितले. तसेच मुलींच्या शिक्षणात आणि विकासात गुंतवणूक करणे हे भारताच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Published on: Jul 12, 2026 4:15 PM
Follow Us