ईडीच्या कारवाईविरोधात हसन मुश्रीफ यांची हायकोर्टात धाव, काय दिली प्रतिक्रिया?
VIDEO | ज्या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही...., नॉटरिचेबल असणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी कागलच्या आपल्या घरून माध्यमांशी साधला संवाद
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीने समन्स बजावले असून ते आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर येथील कागलच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली त्यानंतर हसन मुश्रीफ नॉटरिचेबल होते आणि थेट आज कागलच्या आपल्या घरी असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने मी तिथे होतो. आज कागलला कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलो. आज ईडीच्या चौकशीला मी हजर राहू शकणार नाही. माझे वकील ईडीकडून मुदत मागणार आहे. ज्या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही, त्याचे समन्स ईडीकडून पाठवण्यात आले आहे.’, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून हसन मुश्रीफ हे आमदार असल्याने मुश्रीफ ईडीसमोर हजर राहणार की नाही याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. तर हसन मुश्रीफ यांचे वकील मुदत वाढवण्याची मागणी करत ईडी कार्यालयात त्यांची बाजू मांडणार आहेत.
