Omraje Nimbalkar | खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपयाही…

Omraje Nimbalkar | खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपयाही…

| Updated on: Jun 23, 2026 | 3:15 PM

ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील नेत्यांमध्ये जोरदार वाद-विवाद सुरू आहेत. यावेळी अनेकांनी खासदार निधीचं कारण देऊन दुसऱ्या पक्षात गेले, मात्र त्यांनी मिळालेला निधी खर्च केला नाही,

ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील नेत्यांमध्ये जोरदार वाद-विवाद सुरू आहेत. यावेळी अनेकांनी खासदार निधीचं कारण देऊन दुसऱ्या पक्षात गेले, मात्र त्यांनी मिळालेला निधी खर्च केला नाही, असे विधान केले होते. यावर आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांसमोर येऊन मोठा खुलासा केला आहे.

ओमराजे म्हणाले, “मी निधीचा पूर्णपणे वापर केला आहे. मी २०१९ पासून २०२४ पर्यंत खासदार होतो आणि त्यावेळी मला पाच कोटी निधी मिळतो, त्यानुसार मी माझा निधी वापरला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा बांधणे, रस्ते काम अशा सर्व कामांसाठी मी निधी वापरला असून कोणतीही रक्कम उर्वरित नाही, तुम्ही स्वतः तपासा…” पुढे ओमराजे म्हणाले, “अनेक जण तीन कोटी वापरले नाहीत असे दाखवत आहेत, मात्र तो माझ्या आधीच्या खासदाराने न वापरलेला असून तो मला मिळाला आहे.”

Published on: Jun 23, 2026 3:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us