Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच

Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच

| Updated on: Jun 21, 2026 | 1:35 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान दौंडमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. दौंड येथील चतुर्थी हॉटेलमध्ये ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भेट झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शिवसेनेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत निंबाळकर यांनी पक्षातच राहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ओमराजे निंबाळकर यांच्या ताफ्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. नाना भानगिरे हे देखील त्यांच्या ताफ्यासोबत धाराशिवकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या हालचालींमध्ये तानाजी सावंत यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याआधी खासदार ओमराजे निंबाळकर यांना विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा झालेली नसली तरी, ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राहण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, त्यांच्या अंतिम निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 21, 2026 1:33 PM
Follow Us