Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराने दिली माहिती
Indian Army Press Conference : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे पाच जवान शाहिद झाले आहेत. याबद्दलची माहिती लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे पाच जवान शाहिद झाले आहेत. या जवानांना वीरमरण आल्याची माहिती भारतीय लष्कराकडूनच देण्यात आलेली आहे. तिन्ही लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना डिजीएमओ राजीव घई यांनी सांगितलं की, मी ऑपरेशन सिंदूरमध्ये बलिदान दिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आणि भावांना जे सैन्यात होते, त्यांना श्रद्धांजली वाहतो. तसंच ज्या नागरिकांना दुर्दैवीपणे जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही हृदयापासून कायम ऋणी राहू. या सर्वांनी एकजुटीच दर्शन दाखवलं आहे, असं यावेळी घई यांनी म्हंटलं.
Published on: May 12, 2025 11:55 AM

