Operation Sindoor : लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ शेअर, पाकला कसं उद्ध्वस्त केले… एकदा बघाच
ऑपरेशन सिंदूरशी संबंधित व्हिडिओ लष्कराकडून सतत शेअर केले जात आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला कसे प्रत्युत्तर दिले आणि शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या हे पाहता येते.
भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने ‘ऑपरेशन सिंदूर’चा आणखी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांना कसं प्रत्युत्तर दिलंय हे दाखवण्यात आलंय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतीय लष्कर योग्य उत्तर देताना दिसत असून आपल्या सैन्याने शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचे पाहायला मिळतंय. ५३ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कर, सैन्याचे शौर्य आणि धाडस दिसून येते. पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय लष्कराने उधळून लावल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या भारतीय लष्कराच्या व्हिडीओला “आम्ही शत्रूंचा नाश करण्यासाठी काम केले.” असं कॅप्शन देण्यात आले आहे. यासह पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय सैन्याने कसे योग्य प्रत्युत्तर दिले हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सैन्याने शत्रूच्या चौक्यांना लक्ष्य केले आणि त्या उद्ध्वस्त केल्या. ही कारवाई पाकिस्तानच्या नापाक कारवायांविरुद्ध एक मजबूत संदेश आहे, जिथे त्यांचे प्रत्येक कट उधळून लावण्यात आले.