Kiren Rijiju On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजून… मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?

Kiren Rijiju On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजून… मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?

Harshada Shinkar | Updated on: May 08, 2025 | 1:54 PM

ऑपरेशन सिंदूरवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि बैठकीत त्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली.

भारताकडून नुकतंच पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आलं. भारताने केलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानच्या ९ ठिकाणांवर हल्ले केले. अशातच मोदी सरकारकडून आणखी एक मोठं वक्तव्य करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. याचा अर्थ भारतीय लष्कर दहशतवाद्यांवर सतत कारवाई करत आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधान केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. ज्यात त्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व नेत्यांनी एकता दाखवली आहे. सशस्त्र दलांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मंत्री किरेन रिजिजू पुढे असेही म्हणाले, काही सूचना देखील मिळाल्या आहेत ज्या सरकार गांभीर्याने घेईल. सर्व पक्षांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एकमताने लष्कराचे अभिनंदन केले आणि एकत्रित पाठिंबा दर्शविला.

Published on: May 08, 2025 1:53 PM
Follow Us