Video : ‘जास्त बोलू नको, औकातीत राहा’ ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला का सुनावलं?

संतोष जाधव

संतोष जाधव | Edited By: मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Dec 03, 2022 | 3:47 PM

ठाकरे गटाचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यातील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Video : 'जास्त बोलू नको, औकातीत राहा' ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला का सुनावलं?
Image Credit source: tv9 marathi

उस्मानाबादः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील (Rana Jagjeetsingh Patil) यांच्यात आज टोकाची हमरीतुमरी झाली. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा अशी धमकी खासदार ओम राजे यांनी आमदार राणा यांना दिली.

तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यातील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमका वाद का झाला?

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप 2022 मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने 254 कोटी रुपये विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. मात्र नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या आहेत.  तसेच काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगातून  झालेले नुकसान यापोटी मिळणाऱ्या भरपाईचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आज सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी तक्रार निवारण  आयोजन करण्यात आले होते.

सदरील बैठक जिल्हाधिकार्यालयात तक्रार निवारणाच्या अनुषंगाने चालू असताना लोकप्रतिनिधींना बोलवण्यावरून शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्यासमोर शाब्दिक चकमक झाली.

सदरील बैठकीस लोकप्रतिनिधींना का बोलवण्यात आले नाही… असा सवाल जिल्हाधिकारी सचिन ओमबासे यांना ओमराजे यांच्यावतीने करण्यात आला, तेव्हा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील ओमराजेंना उद्देशून “बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे” असं बोलल्याने ओमराजे यांचा संताप अनावर झाला… त्यावर उत्तर देताना ओमराजे निंबाळकर चिडले. तू तू नीट बोल तुझ्या अवकातीत रहा तुझे संस्कार माहित आहेत .. अशा एकेरी भाषेत ओमराजे यांनी भाजप खासदार राणा जगदीश सिंह पाटील यांना सुनावले …

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI