Operation Sindoor : पाकिस्तानकडून सलग 4 दिवस ड्रोन हल्ले? प्रत्येक वेळेला 300-400 ड्रोन थेट भारताच्या हद्दीत अन्…
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानने ६-७ मे रोजी ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला. त्याचा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला. पाकिस्तानला जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील शहरांना लक्ष्य करायचे होते. त्याची प्रत्येक योजना उधळून लावली गेली आहे.
भारताकडून पाकिस्तानर ऑपरेश सिंदूर राबविण्यात आल्यानंतर पाकिस्ताकडून भारतावर सलग चार दिवस ड्रोन हल्ले करण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाहीतर प्रत्येक हल्ल्यावेळी पाकिस्तान प्रत्येक लाटेत तब्बल ३०० ते ४०० ड्रोन थव्याने भारतातील हद्दीत पाठवायचा अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. भारताचा दारूगोळा आणि क्षेपणास्त्र संपवणं, असा एकच उद्देश पाकिस्तानच्या या ड्रोन हल्ल्यामागे होता, असंही आता सूत्रांकडून कळतंय. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर झालेल्या अचूक हल्ल्यांमुळे निराश होऊन, पाकिस्तानने भारताविरुद्ध ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा कट रचला. त्याचे मुख्य लक्ष्य जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील प्रमुख शहरे होती. ज्यामध्ये पवित्र सुवर्ण मंदिराचे नुकसान करणे हा मुख्य उद्देश होता.