Special Report | भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानी कट!

| Updated on: Sep 15, 2021 | 11:30 PM

जान मोहम्मद सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलसाठी कुरिअर बॉय म्हणून काम करत होता, अशी माहिती शेखच्या पत्नीने चौकशी दरम्यान दिल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

Follow us on

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा (Pakistan-organized module) भांडाफोड केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या 47 वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची त्याने रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली.

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली. राजस्थानच्या कोटामधून जान मोहम्मदला ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.