AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत

भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत

| Updated on: Aug 03, 2026 | 11:46 AM
Share

पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेत काल मोठा गोंधळ निर्माण झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच एका व्यक्तीने चाकू घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेत पप्पू यादव थोडक्यात बचावले. घटनेनंतर त्यांनी हा प्रकार आपल्या हत्येचा कट असल्याचा आरोप केला.

पप्पू यादव यांनी सांगितले की, हल्लेखोर चाकू घेऊन पत्रकार परिषदेत आला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दाही अधिक गंभीरपणे चर्चेत आला आहे. पत्रकार परिषदेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हल्ल्याच्या प्रयत्नाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. रोहित पवार म्हणाले, “या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करावा. पुढे त्यांनी सांगितले,या घटने मागचा मास्टर माईंड शोधला पाहिजे. हल्ला करणाऱ्याच्या पाठीवर कोणाचा हात असेल तर त्यालाही समोर आणला पाहिजे.”

Published on: Aug 03, 2026 11:46 AM

Follow Us