पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्…  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी

पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्… प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी

| Updated on: Jul 28, 2026 | 12:16 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांत ही चर्चा मंदावली होती. मात्र, दिल्लीत झालेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे या चर्चेला पुन्हा वेग मिळाल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांकडून विलिनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बैठका आणि भेटींनंतर पुढे कोणता निर्णय होणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

Published on: Jul 28, 2026 12:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us