Patil VS Raut | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन चंद्रकांत पाटील VS संजय राऊतांमध्ये महा’सामना’

Patil VS Raut | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन चंद्रकांत पाटील VS संजय राऊतांमध्ये महा’सामना’

| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 22, 2021 | 9:52 PM

उद्धव ठाकरेंचा पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

द्धव ठाकरे यांच्या हिवाळी अधिवेशनातील अनुपस्थितीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

चंद्रकांत पाटलांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत. अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का, असा सवाल करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. चंद्रकांत दादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us