Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये… पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असून कोर्टाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निरीक्षण नोंदवले आहे. विशेषतः माफीच्या साक्षीदाराच्या बदलत्या जबाबांवर न्यायालयाने गंभीर शंका व्यक्त केली आहे.
हायप्रोफाईल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असून कोर्टाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निरीक्षण नोंदवले आहे. विशेषतः माफीच्या साक्षीदाराच्या बदलत्या जबाबांवर न्यायालयाने गंभीर शंका व्यक्त केली आहे. कोर्टाने म्हटले की, माफीच्या साक्षीदाराने वारंवार वेगवेगळे जबाब दिल्याने त्याच्या साक्षीची विश्वासार्हता कमी होते. इतकेच नाही तर तो इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये राहिल्याचंही समोर आलं आहे. त्याने वेगवेगळ्या गाड्यांनी प्रवास केला होता.
चार्जशीट दाखल होण्यापूर्वी काही दिवस पुन्हा त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी त्याला तब्बल 100 तासांचा वेळ देण्यात आल्याचेही कोर्टाने नमूद केले. तसेच न्यायाधीशांनी त्या जबाबावर स्वाक्षरी केली नसल्याचेही समोर आले आहे.
माफीच्या साक्षीदाराने न्यायालयात दिलेल्या अर्जात स्वतःला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला होता. तसेच आजारपणाची औषधेही घेऊ दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे. 5 मार्च 2019 रोजी केलेल्या अर्जात इतर आरोपी जामिनावर बाहेर असून आपणच तुरुंगात असल्याची नाराजी त्याने व्यक्त केली होती. या सर्व बाबींमुळे प्रकरणातील संशय अधिक गडद झाल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
