PM MODI : … तर दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमतं, असं म्हणत मोदींनी भारतीय सैन्याला सांगितली ‘ही’ त्रिसूत्री
'दहशतवादाविरूद्ध भारताची लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. आता टेरर अटॅक झाला तर भारत उत्तर देईल आणि पक्कं उत्तर देईल. आपण सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक द्वारे पाहिलं आहे. आता ऑपरेशन सिंदूर भारताचं न्यू नॉर्मल आहे.', असे मोदी म्हणाले.
देशातील सर्व एअरबेसशी संबंधित सैनिकांचे मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले, तुम्ही खूप छान काम केले आहे. दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मणरेषा आता अगदी स्पष्ट झाली आहे. आता जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल आणि कडक प्रत्युत्तर देईल. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक दरम्यान आपण ते पाहिले आहे. आता ऑपरेशन सिंदूर हे भारतातील न्यू नॉर्मल आहे. भारताने आता तीन तत्वांवर निर्णय घेतला आहे. अदमपूर एअरबेस येथील जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याला त्रिसूत्री सांगितली. मोदी म्हणाले, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देणार.. भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही यासह भारत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या सरकार आणि त्याच्या आकांना वेगळे पाहणार नाही. आपल्याला शत्रूंना आठवण करून देत राहायचं आहे की, हा नवा भारत आहे. या भारताला शांतता हवी. पण मानवतेवर हल्ला झाला तर हा भारत युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमतं, असं मोदी म्हणाले.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?

