PM MODI : मोदींचा पुन्हा हल्लाबोल, दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी अन्…
'पाकिस्तानमधील असा कोणता ठिकाणा नाही की जिथे बसून दहशतवादी आरामात राहू शकेल. आम्ही घरात घुसून मारू. आणि वाचण्याची एक संधीही देणार नाही. ', मोदी म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य मोहीम नाहीये. ही भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षंमतेची त्रिवेणी आहे. भारताची बुद्धाची भूमी आहे. तर गुरू गोविंद सिंगांचीही धरती आहे. सव्वा लाख से एक लगाम… असं गुरुगोविंद सिंग म्हणाले होते’, असं म्हणत मोदी म्हणाले, अधर्माचा नाश, धर्माच्या स्थापनेसाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. पुढे मोदी असेही म्हणाले की, जेव्हा आपल्या मुली, बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा अतिरेक्यांचा फणा आपण त्यांच्या घरात घुसून ठेचला. ते भेदरटपणे लपले होते. पण त्यांनी ज्यांना आव्हान दिलं ती हिंदची सैना आहे हे ते विसरले. आदमपूर एअरबेसवर जवानांसमोर बोलताना मोदी म्हणाले, तुम्ही दहशतवाद्यांना समोरून मारलं. ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केलीत. १०० हून अतिरेकी मारले. दहशतवाद्यांच्या आकांना आता समजलं असेल की भारताकडे नजर उचलून पाहण्याचा एकच परिणाम होईल तो म्हणजे बर्बादी. निर्दोष भारतीयांना मारण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश. आणखी महाविनाश. ज्या दहशतवाद्यांच्या भरवश्यावर जे दहशतवादी बसले होते. त्या पाकिस्तानी सैन्यालाही आपण धूळ चारली असल्याचे मोदी म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

