Praful Patel | प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार का, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या चर्चांवर स्वतः प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार का, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या चर्चांवर स्वतः प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.” पटेल यांच्या या ट्विटनंतर माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या विविध राजकीय घडामोडी सुरू असल्याने अशा बातम्या वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. मात्र प्रफुल पटेल यांच्या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
