Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी…
मराठी भाषा, ईव्ही वाहनं आणि राज्यातील राजकीय मुद्द्यांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध विषयांवर भाष्य केले. महाराष्ट्र पर्यावरणपूरक करण्यासाठी जास्तीत जास्त ईव्ही व्हेकलचा वापर वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी शिकण्याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “आमच्याकडे मराठी शिकायला 1 लाख 35 हजार अर्ज प्राप्त झाले.” अमराठी चालकांना मराठीचे शिक्षक धडे देत असून, 1 मेपासून आतापर्यंत 105 दिवस मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. प्रवाशांसोबत जुजबी मराठी बोलता आलं नाही तर आरटीओ कायद्याच्या अंतर्गत कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीचं प्रमाणपत्र असलं तरी आरटीओ अधिकारी तपासणी करणार आहेत. टॅक्सी आणि रिक्षा चालकांची मुजोरी चालणार नाही, काही लोक मुजोरी करतायत, असेही ते म्हणाले.
टाटा व्यावसायिकांबाबत बोलताना 15 तारखेपर्यंत वर्ग सुरू असून त्यांनी मराठी शिकावी, असे सरनाईक म्हणाले. गणेश नाईक यांच्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ठाण्यात क्लस्टर योजना चांगल्या प्रकारे चालते, त्याचा फायदा गणेश नाईकांनी करून घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना भविष्यात संख्याबळ वाढलं तर मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू, असे सरनाईक म्हणाले. जरांगे यांच्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.