मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण

मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण

| Updated on: May 09, 2025 | 2:40 PM

मोहनलाल आणि मम्मूटी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कलाकार. त्यांचे चित्रपट जितके गाजतात, तितकीच त्यांच्या मैत्रीचीही चर्चा होते. मोहनलाल यांनी शबरीमला मंदिरात मित्र मम्मूटीसाठी खास पूजा केली. यावरूनच मोठा वाद निर्माण झाला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहनलाल यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध शबरीमला मंदिरात पूजा केली. या पूजेची पावती जेव्हा सोशल मीडियावर लीक झाली, तेव्हा त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. कारण त्या पूजेच्या पावतीवर मोहनलाल यांचा खास मित्र आणि सुपरस्टार मम्मूटी यांचं नाव होतं. मोहम्मद कुट्टी हे नाव आणि त्यांच्या जन्म नक्षत्राचा उल्लेख त्या पावतीवर होता. यावरून अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामागचं कारण म्हणजे मम्मूटी हे मुस्लिम आहेत आणि इस्लामातील श्रद्धेनुसार अल्लाहशिवाय ते दुसऱ्या कोणत्याच देवाकडे प्रार्थना करू शकत नाहीत. त्यामुळे जर मम्मूटी यांनी मोहनलाल यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं असेल तर त्यांनी सर्वांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. मोहनलाल आणि मम्मूटी हे एकमेकांचे खूप घनिष्ठ मित्र आहेत. मम्मूटी यांच्या स्वास्थ्यासाठी मोहनलाल यांनी मंदिरात पूजा केल्याचं म्हटलं गेलं. हा संपूर्ण वाद काय आहे, त्यावर दोन्ही सेलिब्रिटींनी काय प्रतिक्रिया दिल्या… ते सविस्तर जाणून घेऊयात.

Published on: May 09, 2025 02:39 PM
Follow Us