मुस्कानचे नाव आता मालेगावातील उर्दू घराला मिळणार

मुस्कानचे नाव आता मालेगावातील उर्दू घराला मिळणार

| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 10, 2022 | 8:56 PM

हिजाब प्रकरणात घोषणाबाजी देणारी तरुणी अचानक प्रकाशझोतात आली असून या तरुणीचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याचा प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर ताहेरा शेख यांनी मांडणार असल्याचे सांगितले.

हिजाब प्रकरणात घोषणाबाजी देणारी तरुणी अचानक प्रकाशझोतात आली असून या तरुणीला मौलाना मदनी यांनी पाच लाखांचे पारितोषिक जाहिर केले असतानाच मुस्कान खान या तरुणीचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याचा प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर ताहेरा शेख यांनी मांडणार असल्याचे सांगितले. महापौर मालेगाव महानगरपालिकेत हा ठराव मांडणार असल्याचे सांगितले आहे. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, या जिगरबाज तरुणीचे नाव उर्दू घराला देवून आम्ही तीचा सन्मान करणार आहोत. हिजाबला घेऊन जो वाद घालण्यात आला आहे तो चुकीचा असून त्याविरोधात मुस्कानने उठवलेला आवाज नक्कीच स्वागतार्ह आहे. हिजाबबाबत मुस्लिम महिलांना टार्गेट करणे चुकीचे असून याविरोधात मुस्कानने आवाज उठविली तिच्या या धाडसाला सलाम करण्यासाठी आम्ही तिचे नाव ऊर्दू घराला देत आहोत असे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us